क्रीडा आणि युवक संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि यवतमाळ जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुल येथे आयोजित १४, १७ आणि १९ वर्षे गटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आयोजित राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पध्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला. ४५० वर मल्लखांबपटूंनी या स्पध्रेत भाग घेतला होता. शरीर स्वास्थ्यासाठी मल्लखांबसारख्या खेळाची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन माजी क्रीडामंत्री व विद्यमान विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी या स्पर्धाच्या उद्घाटनप्रसंगी केले. याप्रसंगी अमरावती विभागाच्या क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, तसेच सुजीत शेळके, डॉ. सुभाष डोंगरे, विलास दलाल, शशी सुरवे इत्यादी अधिकारी हजर होते. स्पर्धाचे संचालन कैलास राऊत यांनी, तर आभार विजय संतान यांनी मानले.