संगणकाच्या काळात सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व शाळा-महाविद्यालयातून टिकवून ठेवणे गरजेचे आहे. माणसांचे मन ओळखायचे असेल तर ते त्यांच्या अक्षरातून कळत असते, त्यामुळे सुंदर हस्ताक्षर हे सच्च्या मनाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, शिक्षण उपसंचालक, महापालिका शिक्षण विभाग, रायसोनी ग्रुप, रामन विज्ञान केंद्र आणि अक्षरभूषण मधुकर भाकरे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा पारितोषिक कार्यक्रमाच्यावेळी विजय वडेट्टीवार बोलत होते. शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शिक्षण उपसंचालक महेश करजगावकर, महापालिकेचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, शिक्षण सभापती अविनाश ठाकरे, रायसोनी ग्रुपचे हेमंत सोनारे, रमेश बोरकुटे, मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक विनोद शेकदार, नगरसेवक बंडू राऊत, राजाभाऊ चिटणीस, वि.भ. करगुटकर उपस्थित होते. यावेळी बसोलीचे प्रमुख चंद्रकांत चन्न्ो यांचा विजय वड्डेटीवार यांच्या हस्ते शिक्षक जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अक्षरधन या मासिकाचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी वड्डेटीवार म्हणाले, पूर्वी हस्ताक्षराच्या प्रेमात पडणारी एक पिढी होती मात्र, आज त्याकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. हस्ताक्षरामुळे मनुष्याचा स्वभाव ओळखता येतो. सुंदर हस्ताक्षर ही ईश्वराने दिलेली देणगी असली तरी त्याचा सराव करणे तितकेच आवश्यक आहे. राज्य शासनाच्या सर्व शिक्षा अभियान या उपक्रमात सुंदर हस्ताक्षर हा प्रकल्पाचा समावेश करण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिले. सुंदर हस्ताक्षर प्रकल्पाबाबत माहिती देत हा उपक्रमाचा समाजात प्रचार आणि प्रसार कार्य करण्याची गरज असल्याचे मत महेश करजगावकर आणि हेमंत सोनारे यांनी व्यक्त केले. अविनाश ठाकरे व चंद्रकात चन्न्ो यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन संजय भाकरे तर पारितोषिकाचे वाचन अजय भाकरे यांनी केले. अभय भाकरे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.  
या स्पर्धेतील पारितोषिके  विजेते- गट अ- वर्ग ८ते १० – गणेश सपकाळ (केशवनगर माध्यमिक विद्यालय), आदिती डेहनकर (सोमलवार हायस्कूल निकालस), शीत्रल पोहरे (दादासाहेब धनवटे नगर विद्यालय) स्विटी मधुकर तलमले (विश्वास माध्यमिक विद्यालय),समिक्षा थोटे (शिशु ज्ञान मंदिर), आर एश्वर्या (भारतीय विद्या भवन), भारती उईके (विद्याभूषण विद्यालय), आरती बरगट (डॉ. राम मनोहर लोहिया हायस्कूल), इयत्ता ५ ते ७- प्रणय वाकोडीकर (राजेंद्र हायस्कूल), प्रिया शहारे (विश्वास माध्यमिक विद्यालय), सोनिया बाजपेयी (वीरशैव प्राथमिक शाळा), तेजस टुले (केशवनगर उच्च माध्यमिक शाळा), अमर बन्सोड (विद्या विजय उच्च प्राथ. शाळा), ऐश्वर्या झाडे (साऊथ पॉईंट स्कूल), आर्या चाटी (बीएर मुंडले हायस्कूल), ऋषिका जोशी (भवन्स विद्या मंदिर), इयत्ता १ ते ४- अनुष्का पाटील (नवयुग प्राथमिक शाळा), गौरी रामटेके (सोमलवार मराठी शाळा), संपदा वाटकर (संजुबा हायस्कूल), कांचन देवघरे (सोमलवार रामदासपेठ), सश्रुती नाकाडे (सेंट झेवियर्स), यशश्री तराळे (नवयुग प्रा. शाळा), सानिया तिजारे(केशवनगर शाळा), समिक्षा बोरकर (विश्वास प्राथमिक शाळा)
सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण