नाशिक येथील एचपीटी महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थ्यांविषयी विचार’ या विषयावर उत्तमराव सोनकांबळे यांनी मार्गदर्शन केले. आयुष्यात कितीही अडचणी, अपयश आले तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘विद्यार्थी’ म्हणून आदर्श समोर ठेवाल तर, यश निश्चित मिळेल. विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवून जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास करावा, असे आवाहन सोनकांबळे यांनी केले.
आंबेडकरांनी खडतर परिस्थितीवर मात करून विद्याभ्यास केला म्हणून ते विद्वान होऊ शकले. डॉ. आंबेडकर १८ तास अभ्यास करायचे. हा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर यश निमित्त मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रामात प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, विद्याथर्ी सभेचे कार्याध्यक्ष प्रा. आर. टी. आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. संयोजन समितीचे समन्वयक प्रा. डॉ. विजयकुमार वावळे यांनी प्रास्तविक केले.