गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात व आबालवृध्दांच्या अमाप उत्साहात पाच दिवसांच्या घरगुती गणपती व गौरीचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले. यावेळी पंचगगा नदीघाट अक्षरश: गर्दीने फुलून गेला होता. महापालिकेच्या वतीने विसर्जनच्या विविध ठिकाणी वीसहून अधिक काहिलींची सोय विसर्जनासाठी करण्यात आली होती. त्यालाही पर्यावरणप्रेमी गणेशभक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकत्रे यांच्याकडून श्री मूर्ती व निर्माल्य काहिलीत विसर्जन करण्यासाठी आवाहन करताना दिसत होते.
घरगुती गणपतीसह सहकारी संस्था, बँका यांनीही रविवारी श्रींला अखेरचा निरोप दिला. वाहतूक पोलिसांनी केलेल्या योग्य सुबध्द नियोजनामुळे भाविकांना विसर्जन मार्गावर कोणतीही अडचण भासली नाही. तर महापालिका व पर्यावरणप्रेमी संस्थांच्या आवाहनालाही नागरिकांतून प्रतिसाद लाभला. पंचगंगा नदीघाटासह विविध ठिकाणच्या विहिरीत रात्री उशिरापर्यंत हा विसर्जन सोहळा सुरू होता. सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतले होते. पंचगंगा नदीघाटावर बहुतांशी घरगुती गणपतीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. हजारो घरगुती गणेशमूर्तीचे आज विसर्जन करण्यात आले.
गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करीत गणेशभक्त पंचगंगा नदीकडे कूच करीत होते. पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण पाहता नदीघाटावर नागरिकांनी जबाबदारी ओळखून निर्माल्याचे दान केले. नदी घाटावर विसर्जनसाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक शाखेनेही योग्य नियोजन केले होते.
इचलकरंजीतही उत्साहात श्रींचे विसर्जन
इचलकरंजी नगरपालिकेने गांधी पुतळा येथे मोठी काहील ठेवून त्यामध्ये विसर्जन करून मूर्तीचे दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला नागरिकांतूनही मोठा प्रतिसाद लाभला. नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर, मुख्याधिकारी सुनिल पवार, आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. दिवसभरात सुमारे हजाराहून अधिक मूर्ती दान करण्यात आल्या.
पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण पाहता नदीघाटावर नागरिकांनी जबाबदारी ओळखून निर्माल्याचे दान केले. नदी घाटावर विसर्जनसाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक शाखेनेही योग्य नियोजन केले होते. इचलकरंजी-शिरदवाड रस्त्यावर चारचाकी व तीनचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांची तसेच विसर्जन मार्गावर कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. वाहतूक शाखेचे सपोनि राजू तहसीलदार हे स्वत आपल्या सहकार्यासह परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. घाटावर पालिकेने दक्षतेचे उपाय म्हणून अग्निशामक दल व आरोग्य विभागाचे पथक तनात ठेवले होते. तर नदीपात्रात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पंचगंगा जलविहार तरुण मंडळाचे कार्यकत्रे होडी व यांत्रिक बोटीतून लक्ष ठेवून होते.