स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर गप्पा मारण्यासाठी करणाऱ्यांमध्ये भारतीय अव्वल ठरले आहे. देशातील स्मार्टफोन वापरकर्त्यांपैकी बहुतांश लोक आपला अर्धावेळ संवाद अ‍ॅप्स वापरण्यावर घालवितात. ‘एरिक्सन कन्झ्युमर लॅब’ने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वाधिक चाहते भारतात असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्या खालोखाल ब्रिटनमध्ये ५४ टक्के लोक महिन्यांतून एकदा तरी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. जपानमध्ये लाइन या अ‍ॅपचा सर्वाधिक वापर होतो तर अमेरिकेत फेसबुक मेसेंजरला सर्वाधिक पसंती असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या सवयी आणि आवडींबाबत हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

*  स्मार्टफोनधारकांपैकी ९८ टक्के भारतीय महिन्यातून एकदा तरी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात
* हाइकचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण ४४ टक्के
* फेसबुक मेसेंजरचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण ३७ टक्के इतके आहे.

* भारतीय स्मार्टफोनचा जेवढा वापर करतात, त्यापैकी ४७ टक्के वापर हा संवाद अ‍ॅप्सवर घालवितात. हेच प्रमाण जपानमध्ये २० टक्केतर ब्रिटन आणि अमेरिकेत ३० टक्के इतके आहे.
*  स्मार्टफोनचा ११ टक्केवापर मनोरंजनासाठी करतात
* दहा टक्के वापर गेम्स खेळण्यासाठी आणि इतर कारणांसाठी ११ टक्के वापर होत  असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* व्हॉइस कॉलिंग आणि इन्स्टंट मेसेंजिंग अ‍ॅप्सच्या वापरातही भारतीय अव्वल असून देशातील ६६ टक्के स्मार्टफोनधारक या दोन्ही सुविधांचा वापर करतात. २१ टक्के केवळ व्हाइस कॉलिंग, ११ टक्के समाजमाध्यमांसाठी वापर करतात. तर निव्वळ दोन टक्के भारतीय ई-मेल्ससाठी स्मार्टफोन वापरतात. जपानमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ४२ टक्के, ६ टक्के आणि २६ टक्के इतके आहे. ब्रिटन आणि अमेरिकेत स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर हा समाजमाध्यमांसाठी होतो. हे प्रमाण ५३ टक्के इतके आहे.