लॅपटॉप आणि टॅब्लेट्स सहजतेने हाताळणाऱ्या तरूण पिढीला ऐंशीच्या दशकातले कॉम्प्युटर्स कसे होते याची कल्पना करणेही अवघड आहे. मात्र ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या आयटी एक्स्पोमध्ये २८६, ३८६ डेस्कटॉप्स, मदरबोर्ड, मोठय़ा आकाराचे हार्डड्राईव्ह अशी उत्पादने प्रत्यक्ष बघायला मिळणार आहेत. याबरोबरच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील १२५ हून अधिक कंपन्यांनी आणलेल्या नव्या तंत्रज्ञानाचीही माहितीही या निमित्ताने करून घेता येणार आहे.
‘कॉम्प्युटर्स अँड मीडिया डीलर्स असोसिएशन’तर्फे (सीएमडीए) पंधराव्या ‘आयटी एक्स्पो’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते १० डिसेंबर या कालावधीत अॅग्रिकल्चरल कॉलेज ग्राऊंडवर सकाळी १० ते ८ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे. सीएमडीएचे अध्यक्ष जयंत शेटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष रत्नेश राठी आणि सचिव दीपक अगरवाल या वेळी उपस्थित होते.
या प्रदर्शनात माहिती तंत्रज्ञानविषयक अकरा चर्चासत्रे होणार आहेत. सुरक्षिततेसंबंधीच्या सीसीटीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची वाढती मागणी पाहता या उपकरणांसाठीचा एक वेगळा विभागही प्रदर्शनात असणार आहे. याव्यतिरिक्त गेल्या चार वर्षांपासून प्रदर्शनात ई- कचरा गोळा करण्याचा प्रकल्प राबविला जातो. या वर्षीही प्रदर्शनाला भेट देणारे नागरिक निकामी झालेले लॅपटॉप, डेस्कटॉप, मोबाईल, इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असा ई- कचरा जमा करू शकणार आहेत. प्रदर्शनासाठी वीस रूपये प्रवेश फी असून नागरिकांनी ई- कचरा आणल्यास त्यांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. जमा केलेल्या ई- कचऱ्याच्या बदल्यात ठराविक रक्कमही नागरिकांना देण्यात येणार आहे. हा ई- कचरा नंतर वैज्ञानिक पद्धतीने नष्ट केला जातो. गेल्या वर्षी या प्रदर्शनात ८ टन ई- कचरा गोळा करण्यात आला होता.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘आयटी एक्स्पो’ला ७ डिसेंबरपासून सुरूवात
लॅपटॉप आणि टॅब्लेट्स सहजतेने हाताळणाऱ्या तरूण पिढीला ऐंशीच्या दशकातले कॉम्प्युटर्स कसे होते याची कल्पना करणेही अवघड आहे. मात्र ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या आयटी एक्स्पोमध्ये २८६, ३८६ डेस्कटॉप्स, मदरबोर्ड, मोठय़ा आकाराचे हार्डड्राईव्ह अशी उत्पादने प्रत्यक्ष बघायला मिळणार आहेत.
First published on: 04-12-2012 at 04:25 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It explo getrs starts from 7th december