संस्कृती ज्ञातीशी निगडित असल्याने आपण आपल्या ज्ञातीचा अभिमान बाळगावा, असे प्रतिपादन ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी नुकतेच सारस्वत चैतन्य गौरव पुरस्कार सोहोळ्यात केले. सारस्वत प्रकाशन विश्वस्त संस्थेतर्फे प्रभादेवी येथील सारस्वत बँक भवन येथे हा सोहोळा आयोजित करण्यात आला होता.सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर आणि डॉ. नंदकिशोर लाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रातील डॉ. वसुधा कामत, डॉ. संध्या कामथ, अभिनेत्री उषा नाडकर्णी, उदय देशपांडे, गंगाराम म्हांब्रे यांना तसेच सारस्वत हितवर्धक मंडळ या संस्थेला ‘सारस्वत चैतन्य गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. डॉ. संध्या कामथ या वेळी उपस्थित नव्हत्या. मृणाली पाडगावकर, नितीश नाडकर्णी या विद्यार्थ्यांचा सारस्वत चैतन्य विशेष गुणवत्ता पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. डॉ. काकोडकर, डॉ. लाड, एकनाथ ठाकूर यांनीही आपले मनोगत या वेळी व्यक्त केले. डॉ. किशोर रांगणेकर यांनी प्रास्ताविक तर स्मिता गवाणकर यांनी सूत्रसंचालन केले. ‘सारस्वत चैतन्य’चे संपादक प्रमोद तेंडुलकर, कार्यकारी संपादक सुधाकर लोटलीकर, सारस्वत बँकेचे संचालक माधव मंत्री, डॉ. जी. बी. परुळकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 11th May 2013 रोजी प्रकाशित
संस्कृती ज्ञातीशी निगडित-जयंत साळगावकर
संस्कृती ज्ञातीशी निगडित असल्याने आपण आपल्या ज्ञातीचा अभिमान बाळगावा, असे प्रतिपादन ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांनी नुकतेच सारस्वत चैतन्य गौरव पुरस्कार सोहोळ्यात केले.
First published on: 11-05-2013 at 12:19 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant salgaonkar in saraswat chaitanya gourav award function