मुंबईतील वृत्तछायाचित्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कोल्हापुरातील पत्रकारांनी निदर्शने केली. नराधम आरोपींना अटक करण्यात यावी, अशा मागणीच्या घोषणा देण्यात आल्या.
दसरा चौकातील राजर्षी शाहूमहाराज यांच्या पुतळय़ाजवळ पत्रकार व वृत्तछायाचित्रकार यांनी सायंकाळी निदर्शने केली. ज्येष्ठ पत्रकार सोपान पाटील, राजेंद्र मकोटे, सरदार करले यांनी या घटनेचा निषेध नोंदविला. या आंदोलनात महिला पत्रकारांची संख्याही लक्षणीय होती. या वेळी शिवाजी साळोखे, मालोजी केरकर, राज मकानदार, रणजित माजगावकर, शिवाजी यादव, रवींद्र कुलकर्णी, विजय कुंभार, सुनंदा मोरे, नसीम सनदी, पल्लवी आचार्य, अहिल्या परकाळे, दीपाली काटकर, रंजना गायकवाड, श्रद्धा जोगळेकर, शुभांगी तावरे तसेच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष शुभांगी साळोखे उपस्थित होत्या.
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2013 रोजी प्रकाशित
बलात्कार घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात पत्रकारांची निदर्शने
मुंबईतील वृत्तछायाचित्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कोल्हापुरातील पत्रकारांनी निदर्शने केली. नराधम आरोपींना अटक करण्यात यावी, अशा मागणीच्या घोषणा देण्यात आल्या.
First published on: 24-08-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalists demonstration protest to rape in kolhapur