राज्यात तीव्र दुष्काळी स्थिती आहे. दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस लातूर उच्चतम बाजार समितीने २५ लाखांचा निधी दिला. हा निधी देणारी राज्यातील ही पहिली बाजार समिती आहे. आमदार अमित देशमुख यांनी यासाठी पुढाकार घेत मुंबईत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, बाजार समितीचे सभापती विश्वंभर मुळे, उपसभापती पंडित गायकवाड, सचिव मधुकर गुंजकर या वेळी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2013 रोजी प्रकाशित
लातूर बाजार समितीकडून मुख्यमंत्री निधीस २५ लाख
राज्यात तीव्र दुष्काळी स्थिती आहे. दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस लातूर उच्चतम बाजार समितीने २५ लाखांचा निधी दिला. हा निधी देणारी राज्यातील ही पहिली बाजार समिती आहे.
First published on: 05-04-2013 at 02:18 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latur market committee given 25 lacs to chief minister fund for drought affected