जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व नवजीवन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विनोबा भावे नगरात मागास भागातील महिलांसाठी कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी ‘हुंडा प्रतिबंधक कायदा व त्यातील तरतुदी’ यावर माहिती दिली. महिला सशक्तीकरण करण्यासाठी सर्वप्रथम महिलांनी आपली मानसिकता बदलायला हवी. मुलगा-मुलगी हे सारखेच आहेत, असे जेव्हा आपल्या मनाला पटवून देऊ व त्याचे अनुकरण आपल्यापासून करू तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण जागरुक झालो असे म्हणता येईल, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी वैकल्पिक वाद निवारण प्रक्रिया याचीही माहिती दिली.
बालन्याय मंडळाच्या सदस्या अॅड. सुरेखा बोरकुटे यांनी ‘स्त्री भ्रूण हत्या व गर्भलिंग प्रतिबंधक कायदा १९९४’ यावर प्रकाश टाकला.
अॅड. फिलोमिना पिचापल्ली यांनी ‘कौटुंबिक हिंसाचार कायदा व कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार’ या विषयावर माहिती दिली.
यावेळी नवजीवन सोसायटीच्या चमूने ‘हुंडाबळी’ या विषयावर प्रकाश टाकणारे पथनाटय़ सादर केले. या कार्यक्रमास विनोबा भावे नगरातील महिला उपस्थित होत्या.
संग्रहित लेख, दिनांक 11th Mar 2014 रोजी प्रकाशित
महिलांसाठी कायदेविषयक शिबीर
जिल्हा विधि सेवा प्राधिकरण व नवजीवन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य

First published on: 11-03-2014 at 08:43 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legal camp for womens