विधानसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ पासून उरण व पनवेल आणि खालापूरचा काही भाग मिळून नव्याने उरण विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला आहे. मतदारसंघातील मतदार संख्येत पाच वर्षांत वाढ झाली असली तरी येत्या निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य पुरुष मतदारच ठरविणार आहेत. २००९ साली उरण विधानसभा मतदारसंघाची मतदार संख्या २ लाख २९ हजार ४५७ होती. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ लाख १८ हजार ९४३ तर स्त्री मतदारांची संख्या १ लाख १० हजार ५१४ होती. यामध्ये वाढ होऊन सध्या २ लाख ४४ हजार ३५३ झाली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या १ लाख २५ हजार ३८३ इतकी होती तर स्त्री मतदारांची संख्या १ लाख १८ हजार ९७० आहे. मतदार संख्येत १५ हजार ४७७ ने वाढ झाली आहे. पुरुष मतदारांची संख्या अधिक असल्याने उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य पुरुष मतदारांच्या हाती आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2014 रोजी प्रकाशित
उरण विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदारांची संख्या अधिक
विधानसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर २००९ पासून उरण व पनवेल आणि खालापूरचा काही भाग मिळून नव्याने उरण विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला आहे.

First published on: 06-03-2014 at 08:25 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Male voters numbers are more in uran constituency