मालवणी येथे राहणारी तरुणी मंगळवारी सकाळी कार्यालयात जात असताना तिच्यावर एका इसमाने ब्लेडने हल्ला केला. या हल्ल्यातून तरुणी बचावली आहे.
जामिनी सुतार ही २५ वर्षे वयाची तरुणी वास्तुरचनाकार असून सकाळी ७.१५ च्या सुमारास कार्यालयात जाण्यासाठी निघाली. त्यावेळी मागून येत असलेल्या एका इसमाने धारदार ब्लेडने तिच्यावर हल्ला केला. अलीकडेच बसमधून प्रवास करताना या तरुणीचा मोबाईल चोरण्यात आला होता. त्या चोरटय़ाला रंगेहाथ पकडण्यात आले. लोकांनी त्या चोरटय़ाला बेदम मारहाण केली होती. त्या वेळी या इसमाने या तरुणीला धमकी दिली होती. हल्ला करणारा तरुण मोबाईल चोरटा असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th May 2013 रोजी प्रकाशित
मालवणी येथे तरुणीवर ब्लेड हल्ला
मालवणी येथे राहणारी तरुणी मंगळवारी सकाळी कार्यालयात जात असताना तिच्यावर एका इसमाने ब्लेडने हल्ला केला. या हल्ल्यातून तरुणी बचावली आहे.
First published on: 30-05-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malvani bled attack on girl