पुढील वर्षीसाठी होऊ घातलेल्या महाराष्ट्र आरोग्य आणि तंत्रज्ञान-सामाईक प्रवेश परीक्षेसाठीचा (एमएचटी-सीईटी) अभ्यास महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अभ्यासावर बेतली असून परीक्षेच्या तारखा लवकरच घोषित करण्यात येणार आहे. आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्राच्या पदवीच्या प्रथम वर्षांसाठी प्रवेश मिळण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेला दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. पशुविज्ञान विषयांना प्रवेश घ्यायचा असल्यास एमएचटी-सीईटी द्यावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही परीक्षा कालावधी आणि महत्त्वांच्या तारखांची प्रतीक्षा असते. पुढील वर्षी होऊ घातलेल्या या परीक्षेच्या तारखा अद्याप घोषित व्हायच्या असून त्या लवकरच जाहीर करण्यात येतील, असे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे.
बारावी किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेला विद्यार्थी एमएचटी-सीईटी देऊ शकतो. इंग्रजी, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि गणितावर आधारलेल्या या परीक्षेत पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि गणित या तीन विषयांना मिळून एकूण ५० टक्के गुण आवश्यक आहेत. महाराष्ट्रातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यातून ५ टक्क्यांची सूट आहे. गेल्यावर्षी २०११मध्ये बारावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थीही पुढीलवर्षी होऊ घातलेल्या एमएचटी-सीईटीला बसू शकतो.
या परीक्षेचे दीड-दीड तासाचे प्रत्येकी पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्राचे पेपर होतील. ते दोन्ही पेपर प्रत्येकी ५० गुणांचे राहतील तर दुसरा गणित विषयाचा १०० गुणांचा राहील. सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ राहतील आणि प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले जातील. त्यासाठी कोणतीही नकारात्मक गुणदान पद्धत अवलंबली जाणार नसल्याने विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न सोडवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2012 रोजी प्रकाशित
एमएचटी-सीईटी परीक्षेच्या तारखा लवकरच घोषित
पुढील वर्षीसाठी होऊ घातलेल्या महाराष्ट्र आरोग्य आणि तंत्रज्ञान-सामाईक प्रवेश परीक्षेसाठीचा (एमएचटी-सीईटी) अभ्यास महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अभ्यासावर बेतली असून परीक्षेच्या तारखा लवकरच घोषित करण्यात येणार आहे.

First published on: 17-11-2012 at 12:36 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mht cet exams date will be annonce soon