घरात सांगितलेले काम ऐकत नाही, या कारणावरून दारूच्या नशेत स्वतच्या मुलाचा नराधम पित्याने गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे घडली. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
गुंजोटी येथील प्राथमिक विद्यालयात इयत्ता तिसरीमध्ये शिकणारा खंडू धोंडिबा दुधभाते (वय ८) हा मुलगा बहीण व लहान भावासह शाळेस सुटी असल्याने घरीच होता. आई मजुरी, तर वडील गवंडीकाम करतात. चिमुकल्यांची आजी मुलांना घेऊन घरीच होती. रविवारी सायंकाळी आरोपी दुधभाते दारूच्या नशेत कामावरून घरी आला. त्यावेळी घरातील सगळेच बाहेर जाऊन बसले. परंतु त्याच वेळी खेळत खेळत खंडू हा घरामध्ये गेला. त्यावेळी सांगितलेले काम ऐकत नाही, चॉकलेटसाठी पसे मागतोस, असे म्हणत धोंडिबाने चिमुकल्याचा गळा दाबून खून केला व बाहेर जाऊन बसला. लहान मुलीने हा प्रकार बघितल्यानंतर तो उघडकीस आला.
पोलीस पाटील नाजेर देशमुख यांनी या घटनेची पोलिसांना दूरध्वनीवर माहिती दिली. आरोपीची पत्नी भाग्यश्री हिने दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात आरोपी धोंडीबा ऊर्फ प्रमोद म्हाळप्पा दुधभाते याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2014 रोजी प्रकाशित
पित्याकडून मुलाचा गळा दाबून खून
घरात सांगितलेले काम ऐकत नाही, या कारणावरून दारूच्या नशेत स्वतच्या मुलाचा नराधम पित्याने गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे घडली. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

First published on: 21-01-2014 at 01:35 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of son by father