महाराष्ट्र राज्य डॉजबॉल संघटनेच्या वतीने लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होणाऱ्या सहाव्या उपकनिष्ठ आणि सातव्या कनिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्य़ाचे संघ जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी जाहीर केले.
यावेळी कार्याध्यक्ष विलास पाटील, सचिव मुकुंद झनकर, गणेश राऊत, प्रविण भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. उपकनिष्ठ संघात रजा फैज अन्सारी, अरविंद पांढरे, राहुल राठोड, गोविंद तिदमे, नितीन होळ, योगेश खांडबहाले, रुपम बिरारी, विद्यानंद पवार, गौरव विभुते, जस्मित सिंग रिपीयाल, व्यवस्थापक- प्रविण भोसले, प्रशिक्षक- हिरामण शिंदे यांचा  तर कनिष्ठ संघात राहिक खान, सिद्धेश राव, प्रतिक अहिरे, विवेक पाटील, राहुल पवार, दर्शन अहिरे, कुणाल ठाकरे, प्रशांत दळवी, सौरभ लोळगे, अक्षय कानडी, व्यवस्थापक- सागर झनकर, प्रशिक्षक- विलास पाटील, यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राच्या संभाव्य संघात नाशिकचे तीन कबड्डीपटू
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या संभाव्य संघात नाशिक येथील रचना क्लबची सारिका जगताप, क्रीडा प्रबोधिनीची श्वेता सोनवणे आणि प्रणव अहिरे यांचा समावेश करण्यात आला आहे.
सांगली येथे झालेल्या ५९ व्या राज्य  अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीनुसार ही निवड करण्यात आली आहे.स्पर्धेत नाशिकच्या महिला संघाने आठवे तर पुरूषांनी कित्येक वर्षांनंतर सहाव्या स्थानापर्यंत मजल मारली. दोन्ही सघांकडून सारिका, श्वेता, प्रणव यांची कामगिरी लक्षवेधक झाली. या तिघा खेळाडूंची महाराष्ट्र राज्याच्या सराव शिबीरासाठी निवड झाली असून शिबीर सांगली येथे मंगळवारपासून सुरू होत आहे.
या खेळाडूंना जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे, दौलतराव शिंदे, सहकार्यवाह मोहन गायकवाड, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षका शैलजा जैन, कबड्डी प्रशिक्षक प्रशांत भाबड, विलास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले