सरकारी अथवा खासगी संस्थांच्या सेवेतील वकिलांना न्यायालयात खासगी खटला लढविण्यास मनाई केल्यामुळे मुंबई महापालिकेपुढे पेच निर्माण झाला आहे. या निकालाच्या विरोधात अपील करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र तोपर्यंत आपले खटले लढण्यासाठी मानधन देऊन वकिलांची फौज उभी करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. या निर्णयामुळे पालिकेने नियुक्त केलेल्या वकिलांना न्यायालयात पालिकेची बाजू मांडता येणार नाही. विविध न्यायालयांमध्ये पालिकेचे सुमारे ६१ हजारांहून अधिक खटले प्रलंबित आहेत.त्यासाठी पालिकेला खासगी वकील न्यायालयात उभे करावे लागतील. न्यायालयीन लढाई लढण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र आता खासगी वकिलांच्या मानधनामुळे पालिकेचा खर्च ३०० ते ३५० कोटी रुपयांवर जाणार आहे, अशी माहिती भाजपचे गटनेते दिलीप पटेल यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 4th Dec 2012 रोजी प्रकाशित
सेवेतील वकिलांना खासगी खटला लढण्यास मनाई करण्याच्या निर्णयाविरुद्ध पालिका अपील करणार
सरकारी अथवा खासगी संस्थांच्या सेवेतील वकिलांना न्यायालयात खासगी खटला लढविण्यास मनाई केल्यामुळे मुंबई महापालिकेपुढे पेच निर्माण झाला आहे. या निकालाच्या विरोधात अपील करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र तोपर्यंत आपले खटले लढण्यासाठी मानधन देऊन वकिलांची फौज उभी करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.
First published on: 04-12-2012 at 11:19 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now corporation going to appel on servise loyers not allowed to fight against private case