वर्धेकरांना यावर्षी गुढीपाडव्यानिमित्य पाडवा पहाट व सांज पाडवा अशा दोन संगीतमय कार्यक्रमाची मेजवानी लाभणार आहे. रामनवमी शोभायात्रा नागरी समितीतर्फे पाडव्यास पहाटे पाच वाजता संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश मंदिर परिसरात होणाऱ्या यावर्षीच्या कार्यक्रमास सुप्रसिध्द गायक श्रीधर फ डके व चमूची हजेरी लागणार आहे. आमदार प्रा.सुरेश देशमुख व यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेने कार्यक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. कार्यक्रमानिमित्य फु लांची उधळण, प्रभातफे री, शहर सजावट, मिठाई वाटप होणार आहे. पाडव्यालाच सायंकाळी सहा वाजता स्वरांजली संस्थेतर्फे सांज पाडवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सारेगमफे म हिंडोल पेंडसे, ई टिव्हीफेम श्रुती
जैन व श्याम शिंदे हे सूरांची मैफील सजवतील. विकास विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2013 रोजी प्रकाशित
‘पाडवा पहाट आणि सांज पाडवा’वर्ध्यात आज दोन कार्यक्रम
वर्धेकरांना यावर्षी गुढीपाडव्यानिमित्य पाडवा पहाट व सांज पाडवा अशा दोन संगीतमय कार्यक्रमाची मेजवानी लाभणार आहे. रामनवमी शोभायात्रा नागरी समितीतर्फे पाडव्यास पहाटे पाच वाजता संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
First published on: 11-04-2013 at 02:38 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padwa pahat ani sanj padwa two programme in vardha