महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर तालुकाप्रमुख शशिकांत पाटील यांना गुन्हेगारी कारवायांबद्दल सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सोलापूरसह पुणे, सांगली व सातारा या चार जिल्ह्यांतून एक वर्षांसाठी हद्दपार केले आहे. पाटील यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी लावून धरली होती. त्यानुसार ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
पंढरपूर तालुक्यातील अर्जुनसोंड येथे एका चौकाचे नामकरण करण्याच्या कारणावरून गावातील दलित महिला व मुलांना बेदम मारहाण करण्याची घटना घडली होती. या गुन्ह्यात मनसे तालुकाप्रमुख शशिकांत पाटील यांचा सहभाग आढळून आला होता. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अर्जुनसोंड येथे दलित-सवर्ण समाजातील वाढलेले वैमनस्य विचारात घेऊन या प्रकरणास शशिकांत पाटील हेच जबाबदार असल्याने त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी पुढे आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 26th Sep 2013 रोजी प्रकाशित
पंढरपूर मनसे तालुकाप्रमुख चार जिल्ह्यांतून हद्दपार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर तालुकाप्रमुख शशिकांत पाटील यांना गुन्हेगारी कारवायांबद्दल सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सोलापूरसह पुणे, सांगली व सातारा या चार जिल्ह्यांतून एक वर्षांसाठी हद्दपार केले आहे.

First published on: 26-09-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharpur mns taluka pramukh banished from 4 districts