जिल्ह्यातील पेठ येथील वृध्द दाम्पत्य शेजारील गुजरातमध्ये असलेल्या शेतात मुक्कामी असतांना रविवारी रात्री दरोडेखोरांनी चोरीच्या हेतूने केलेल्या हल्ल्यात ठार झाले. हे दोघेही पेठचे सरपंच सुरेंद्र गाडगीळ यांचे आई-वडील आहेत.
सरपंच तथा शिवसेनेचे पदाधिकारी सुरेंद्र गाडगीळ यांचे गुजरातच्या सीमेजवळ शेत आहे. या शेतात सुरेंद्र यांचे आई-वडील रविवारी मुक्कामास गेले होते.
रात्रीच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने काही जणांनी घरात प्रवेश केला. पुंडलिक गाडगीळ (७५) व गोदाबाई गाडगीळ (७०) यांना चोरटय़ांची चाहूल लागल्याने त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
चोरटय़ांनी केलेल्या हल्ल्यात गाडगीळ दाम्पत्य जागीच ठार झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी आजूबाजूच्या रविवाश्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, या घटनेची गुजरातमधील करपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2012 रोजी प्रकाशित
चोरटय़ांच्या हल्ल्यात पेठ सरपंचाचे आई-वडील ठार
जिल्ह्यातील पेठ येथील वृध्द दाम्पत्य शेजारील गुजरातमध्ये असलेल्या शेतात मुक्कामी असतांना रविवारी रात्री दरोडेखोरांनी चोरीच्या हेतूने केलेल्या हल्ल्यात ठार झाले. हे दोघेही पेठचे सरपंच सुरेंद्र गाडगीळ यांचे आई-वडील आहेत.
First published on: 27-11-2012 at 12:17 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peath sarpanch mother and father dead in attack of robbers