जिल्हा नियोजन समितीतून विविध विकासकामांसाठी पैसा दिला जातो. ही कामे आर्थिक वर्षांत पूर्ण होणे गरजेचे आहे. जिल्ह्य़ाच्या विकास आराखडय़ासाठी अतिरिक्त पैसा मागण्यास प्रलंबित कामे लोकसहभागातून त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश सोळंके यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा मीना बुधवंत, उपाध्यक्ष समशेर वरपूडकर, महापौर प्रताप देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. शालीग्राम वानखेडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. पी. मित्रगोत्री, जिल्हा नियोजन अधिकारी एम. जी. बेग आदी उपस्थित होते. पालकमंत्री सोळंके म्हणाले की, रस्त्यांची प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. तसेच विहिरींचे काम प्राधान्याने घेऊन निकषानुसार ही कामे होतात की नाही, यावर लक्ष द्यावे. जि. प. च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांच्या निधीवर लोकप्रतिनिधींवर लक्ष दिले पाहिजे.
निधी पूर्ण खर्च झाला तरच अतिरिक्त निधी वाढवून मिळेल. तसेच खर्च केलेल्या निधीबाबत जिल्हा नियोजन कार्यालयात वेळेवर अहवाल सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज नीला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एन. पटवेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ई. डी. माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. व्ही. देशपांडे आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jan 2013 रोजी प्रकाशित
प्रलंबित कामे लोकसहभागातून करावीत
जिल्हा नियोजन समितीतून विविध विकासकामांसाठी पैसा दिला जातो. ही कामे आर्थिक वर्षांत पूर्ण होणे गरजेचे आहे. जिल्ह्य़ाच्या विकास आराखडय़ासाठी अतिरिक्त पैसा मागण्यास प्रलंबित कामे लोकसहभागातून त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश सोळंके यांनी केल्या.
First published on: 26-01-2013 at 03:41 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pending work can be done with the help of people