ज्येष्ठ चित्रकार व्यंकटेश देशपांडे यांनी भगवद्गीतेतील १८ अध्यायांवर रेखाटलेल्या १८ तैलचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी (दि. २३) संध्याकाळी ६ वाजता उपमहापौर संजय जोशी यांच्या हस्ते होणार आहे. औरंगपुरा येथील बलवंत वाचनालयाच्या कलादालनात २३ ते २५ डिसेंबर दरम्यान प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सर्वांसाठी खुले राहील.
संत साहित्याच्या अभ्यासिका कुमुद गोसावी उद्घाटनास उपस्थित राहणार आहेत. या वेळी उद्योजक सुरेश जोशी यांच्या ‘आत्मरंग’, व्यंकटेश देशपांडे यांच्या ‘चित्रमय भगवद्गीता’ व ‘चित्रमय कृष्णलीला’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येईल.
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2012 रोजी प्रकाशित
भगवद्गीतेवर आधारित चित्रांचे गीताजयंतीनिमित्त रविवारी प्रदर्शन
ज्येष्ठ चित्रकार व्यंकटेश देशपांडे यांनी भगवद्गीतेतील १८ अध्यायांवर रेखाटलेल्या १८ तैलचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी (दि. २३) संध्याकाळी ६ वाजता उपमहापौर संजय जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
First published on: 20-12-2012 at 02:00 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Picture show on bhagwatgeeta