नागपूर फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षणार्थी विमानाचे लँडिंग करताना अचानक संतुलन बिघडल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवरून घसरले आणि गवतात शिरले. सुदैवाने प्रशिक्षणार्थी वैमानिक थोडक्यात बचावला आणि जीवित हानी टळली. विमानाचे किरकोळ नुकसान झाले आहे. घटनेही माहिती मिळताच विमानतळावरील अग्निशमन यंत्रणा ताबडतोब घटनास्थळी पोहोचली. विमानाला गवतातून बाहेर काढण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विमानतळ अधिकारी घटनेची चौकशी करीत आहेत.
नागपूर फ्लाईंग क्लबचा वैमानिक पिवळ्या रंगाच्या चार्ली-७२ विमानाने आकाशात प्रशिक्षण घेत होते. त्याने पाचदा आकाशात झेप घेतली. दुपारी २.२० वाजता नागपूर विमानतळावरून शेवटचे उड्डाण केले आणि ३.०६ वाजता विमानतळावर विमानाला उतरवण्याचा प्रयत्न केला. वैमानिक प्रशिक्षण घेत असल्या कारणाने वैमानिकाला विमानाचे संतुलन सांभाळता आले नाही. संतुलन बिघडले आणि विमान सरळ तेथील गवतात घुसले आणि फसले. त्यामुळे विमानतळावर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. चारही बाजूंनी त्या ठिकाणी गर्दी झाली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वैमानिकाला सुरक्षित बाहेर
काढले.
विमान उतरवताना संतुलन बिघडल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. विमानतळ प्राधिकरणाचे वरिष्ठ संचालक अनिलकुमार यांनी वैमानिक प्रशिक्षण घेत असल्याने त्याला विमानाचे संतुलन नियंत्रित करता न आल्याने घटना घडली असून घटनेची तपासणी करण्यात येईल, असे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2012 रोजी प्रकाशित
फ्लाईंग क्लबचे विमान धावपट्टीवरून घसरले
नागपूर फ्लाईंग क्लबच्या प्रशिक्षणार्थी विमानाचे लँडिंग करताना अचानक संतुलन बिघडल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवरून घसरले आणि गवतात शिरले. सुदैवाने प्रशिक्षणार्थी वैमानिक थोडक्यात बचावला आणि जीवित हानी टळली.
First published on: 01-12-2012 at 06:11 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plane of flying club slipped on runway