भविष्यातील सुदृढ आरोग्यासाठी क्रीडांगणावर खेळणे जीवनात फार आवश्यक आहे, असे प्रतिपादन अमरावती परीक्षेत्र अमरावतीचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी यांनी उदघाटनप्रसंगी केले.
यवतमाळ येथील पोलीस कवायतच्या क्रीडांगणावर आयोजित अमरावती परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-२०१२ चे उदघाटन झाले तेव्हा यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक दिनेश त्यागी,जि.प.यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवलकिशोर राम व पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आदी उपस्थित होते. पोलीस दलाच्या अमरावती परीक्षेत्रात येणाऱ्या पाचही जिल्ह्य़ातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी परीक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धाचे आयोजनाची जबाबदारी यावर्षी यवतमाळ जिल्ह्य़ावर सोपविण्यात आली. त्यात अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, अकोला, यवतमाळ, वाशीम व बुलडाणा या जिल्ह्य़ाचे संघ सहभागी झाले. या सर्व खेळाडूंच्या संघ संचालनासोबत कार्यक्रम संपन्न झाला. उदघाटनाला हॉलीबॉल सामना यवतमाळविरुध्द अमरावती ग्रामीण यांच्या दरम्यान झाला. हा चुरशीचा सामना यवतमाळने २-० अशा सेटमध्ये अमरावती ग्रामीणचा पराभव करून जिंकला.       

lot’s flowers of rememberness

dr.sulabha desh pande, musical

आठवणींची लाख फुले..
डॉ. सुलभा पंडित
रसिक वाचक हो, नमस्कार. पहाता पहाता २०१२ साल संपत आले. ‘लोकसत्ता’ नागपूर आवृत्ती सुरू झाल्यापासून संगीतविषयक स्तंभ लिहिण्याची संधी दिल्याबद्दल  ‘लोकसत्ता’ची आभारी आहे. या ठिकाणी लेखन थांबवित आहे. या स्ंतभलेखनाने मला खूप काही निश्चितच दिले आहे. गाणे ऐकणे, गाण्याबद्दल वाचणे, हे जणू काही अनुसंधानच होते. संगीत-सुरांचा हा बकुळवृक्ष सतत फुलत होता. ‘या बकुळीच्या झाडाखाली, आठवणींची लाख फुले’ गोळा केली. हा आनंद मनात भरून गेला आहे.
खरे सांगायचे तर, मनसोक्त गाणे प्रथम ऐकले आणि नंतर त्यावरचे समालोचन केले.  स्वान्त: सुखाय असा हा ऐकण्याचा आणि लिहिण्याचा आनंद मनापासून घेतला. कोणाचीही सक्ती नसताना, कोणताही व्यावहारिक हेतू मनात न ठेवता मन:पूर्वक लेखन करण्याची एकप्रकारची ‘श्रीमंती’ मला लाभली. म्हणूनच आस्वादात्मक समीक्षा करण्याचा प्रयत्न मी केला. या दरम्यान अनेक कलावंतांच्या गाठीभेटी घेता आल्या. पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, गंगूबाई हनगल, किशोरी अमोणकर यांच्यापासून आशा खाडिलकर, अश्विनी भिडे-देशपांडे, आरती अंकलीकर-टीकेकर, देवकी पंडित, कल्पना झोकरकर यांच्याशी स्नेह जुळला.
स्थानिक गुणी कलावंतांचे तर विशेष मैत्र जुळले. नागपूरमधील सर्व संगीत क्षेत्रच जवळचे आप्त झाले आहेत. हा परीघ
वाढता वाढता खूप वाढत गेला. आजच्या नव्या पिढीच्या कलावंतांपर्यंत ही
वलये पोहोचली. ही ‘मम
सुखाची ठेव’ निरंतर जवळ राहील.
लेख प्रसिद्ध झाल्यानंतर वैदर्भीय वाचकांच्या प्रत्यक्ष भेटीतून, पत्रातून, दूरध्वनीवरून  प्रतिक्रिया नियमितपणे
आल्याने लेखनाचा हुरूप वाढला. ज्येष्ठ पत्रकार केशव
 पोतदारांपासून विवेक जोशी, हेमा पंडित, राईरकर, देशमुख, दिलीप भट यांच्यासारखे कितीतरी नागपूर विदर्भातील रसिक आवर्जून नोंद घेत असत. या प्रतिसादामुळे अधिक जागरूकतेने
लेखन केले गेले. हे सर्व वाचकांचे ऋणच आहे. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार मानायला हवेत. काही वेळा प्रत्यक्ष कलावंतांनीसुद्धा समाधान व्यक्त करून वरिष्ठ कलावंतांनी प्रसंगी मार्गदर्शनही केले. पंडित मनोहर कासलीकर, गोखले, पंडित प्रभाकरराव देशकर यांच्या प्रतिक्रियांचे मूल्य त्यामुळेच आगळेवेगळे वाटले.
क्वचित परखड मतेही प्रकट झाली. लेखनाच्या
जडणघडणीत या सर्वाचाच वाटा आहे, हे प्रांजळपणे कबूल करायलाच हवे.
कार्यक्रम संपूर्णपणे ऐकून दुसऱ्या दिवशी लेख देण्याची मुभा संपादकांकडून दिली गेली. त्यासाठी त्यांचे मन:पूर्वक आभार. नागपूरमधील गेल्या दोन-तीन दशकातील सांगीतिक जगाशी, या नाही त्या कारणाने संपर्क राहिला आहे.
या स्वरसोहळ्यांचे साक्षीदार होता आले. संपादक मंडळ, सर्व सहकारी, असंख्य वाचक, आयोजक, कलावंत आणि रसिक वाचक या सर्वाचे मन:पूर्वक आभार.