घरकाम येत नाही व इतर क्षुल्लक कारणांवरून सासरी होणाऱ्या छळाला वैतागून एका नवविवाहितेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती व सासू या दोघांविरूध्द सदर बझार पोलीस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
कुर्बानहुसेन झोपडपट्टीत घडलेल्या या गुन्ह्य़ाची माहिती अशी की, गुलकशा महिबूब शेख (वय १९) हिचा विवाह महिबूब शेख याजबरोबर झाला होता. परंतु सासरी नांदत असताना घरकाम करता येत नाही म्हणून सासू नूरजहाँ ही तिचा छळ करत असे. तिच्या चिथावणीवरून पती महिबूब हा तिला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याने अखेर जीवनास वैतागून गुलक्शा हिने घरात स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. गंभीर भाजलेल्या अवस्थेत तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता अखेर तिचा मृत्यू झाला. तिची आई हसीना शेख हिच्या फिर्यादीवरून मृत गुलकशा हिच्या पती व सासू या दोघाना अटक करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2013 रोजी प्रकाशित
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती व सासूला पोलीस कोठडी
घरकाम येत नाही व इतर क्षुल्लक कारणांवरून सासरी होणाऱ्या छळाला वैतागून एका नवविवाहितेने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती व सासू या दोघांविरूध्द सदर बझार पोलीस ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
First published on: 05-01-2013 at 08:39 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police custody to husband and mother in law for daughter in laws suicide