लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी हेल्पलाइन सुरू केली आहे. निवडणूकदरम्यान कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग किंवा अन्य तक्रार असल्यास या हेल्पलाइनवर एसएमएसच्या माध्यमातून तक्रार नोंदविता येणार आहे. निवडणुकींमधील होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि निवडणुकांच्या आदर्श आचारसंहितेचे सर्वाकडून काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने ही ९९२००९११०० हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मात्र या हेल्पलाइनवर काही तक्रार असल्यास ती एसएमएसच्या माध्यमातून करता येणार आहे. अपर पोलीस आयुक्त फत्तेसिंग पाटील थेट या तक्रारींची दखल घेणार आहेत.