अभिनेता संजय दत्त शिक्षा भोगण्यासाठी येरवडय़ात गेल्यानंतर त्याच्या चित्रपटांच्या प्रसिद्धिसाठी त्याची पत्नी मान्यता पुढाकार घेणार, असे बोलले जात होते. पण संजयची बहीण खासदार प्रिया दत्त आणि मेव्हणा कुमार गौरव पुढे सरसावले असून या दोघांच्या प्रमुख उपस्थितीत ‘पोलीसगिरी’च्या ट्रेलरचे उद्घाटन पार पडले.
संजय तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याचा हा पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे तो टी. पी. अगरवाल निर्मित ‘पोलीसगिरी’.
या चित्रपटाच्या ट्रेलरचे उदघाटन मंगळवारी झाले संजयची अनुपस्थिती प्रमोशनकरता मारक ठरणार आहे हे खरे आहे. पण, या परिस्थितीत त्याच्या कुटुंबियांकडून प्रमोशनचे काम करून घेणे पटणारे नाही, असे निर्माता अगरवाल यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 31st May 2013 रोजी प्रकाशित
‘पोलीसगिरी’च्या ट्रेलरचे उद्घाटन
अभिनेता संजय दत्त शिक्षा भोगण्यासाठी येरवडय़ात गेल्यानंतर त्याच्या चित्रपटांच्या प्रसिद्धिसाठी त्याची पत्नी मान्यता पुढाकार घेणार, असे बोलले जात होते. पण संजयची बहीण खासदार प्रिया दत्त आणि मेव्हणा कुमार गौरव पुढे सरसावले असून या दोघांच्या प्रमुख उपस्थितीत ‘पोलीसगिरी’च्या ट्रेलरचे उद्घाटन पार पडले.
First published on: 31-05-2013 at 12:21 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Polisagiri trailer launched