बहुजन स्वराज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद नाथेकर यांनी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा केली.
महासंघाचे प्रदेश सरचिटणीस शेख रफीक साबीर यांनी जुने नाशिक परिसरातील कथडा येथे मेळाव्यात या उमेदवारीसंदर्भात माहिती दिली. दर पाच वर्षांनंतर निवडणुका येतात. निवडणूक आली की न दिसणारे नेते पायी फिरून मतदारांना असंख्य आश्वासने देतात. परंतु निवडणूक संपली की मतदारांना भेटणेही टाळतात, असे शेख यांनी सांगितले. नागरिक वारंवार लोकप्रतिनिधींना भेटण्याचा प्रयत्न करतात, परंतु तरीही त्यांना लोकप्रतिनिधी भेटत नाहीत.
नाथेकर हे कुठल्याही सत्तेत नाही. कुठलेही मोठे पद त्यांच्याकडे नाही. तरीही सर्वसामान्य जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या निवारणासाठी कार्यकुशलतेने सतत प्रयत्नशील राहतात. त्यामुळेच ते निवडणूक लढवित असल्याचे
रफिक शेख यांनी सांगितले. यावेळी एम. बी. शेख, अशोक साठे, राजु बत्तीसे, शेख टिपु राजा, अॅन्थोनी फर्नाडीस, वसिम पठाण आदींसह महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.