‘घोटभर पाणी’, ‘गांधी आंबेडकर’ आणि ‘किरवंत’ या प्रेमानंद गज्वी लिखित आणि मराठी रंगभूमीवर गाजलेल्या तीन नाटकांचा संग्रह ‘द स्ट्रेंग्थ ऑफ अवर रिस्ट्स’ या नावाने इंग्रजीत आला आहे. ‘नवायन’ या दिल्लीच्या चोखंदळ प्रकाशनसंस्थेने काढलेल्या या पुस्तकातील दोन अनुवाद शांता गोखले यांनी, तर ‘किरवंत’चा अनुवाद म. द. हातकणंगलेकरांनी केला आहे.
दादरच्या शिवाजी मंदिरातील मॅजेस्टिक ग्रंथदालनात, अशोक कोठावळे यांनी या इंग्रजी नाटय़संग्रहाचे मुंबई-अवतरण (लाँचिंग) केले. भारतीय भाषांतील सवरेत्कृष्ट एकांकिकांपैकी एक असलेल्या ‘घोटभर पाणी’चा अनुवाद प्रथमच झाला असला, तरी ‘किरवंत’ आणि ‘गांधी-आंबेडकर’ या दोन्ही नाटकांचे अनुवाद यापूर्वी कन्नड व हिंदीत झाले होते. कन्नड अनुवादक डॉ. डी. एम. चोगले यांनीच गज्वींचे ‘शुद्ध बीजापोटी’ कन्नडमध्ये आणले, तर हिंदी ‘किरवंत’चा (अनु. पं. वसंत देव) प्रयोग प्रतिष्ठेच्या ‘भारत रंगमहोत्सवा’त सादर झाला. मराठीत नाना पाटेकरांनी अजरामर केलेल्या ‘तन माजोरी’ या गज्वीलिखित नाटकाचाही अनुवाद यापूर्वी हिंदीत झाला आहे, अशी माहिती कोठावळे यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 15th Sep 2013 रोजी प्रकाशित
प्रेमानंद गज्वी यांची तीन नाटके इंग्रजीत
‘घोटभर पाणी’, ‘गांधी आंबेडकर’ आणि ‘किरवंत’ या प्रेमानंद गज्वी लिखित आणि मराठी रंगभूमीवर गाजलेल्या तीन

First published on: 15-09-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premananda gajvis tree plays in english