सटाणा सहकारी ग्राहक संघाच्या सभापतीपदी भाजपचे माजी जिल्हा चिटणीस तसेच महाराष्ट्र राज्य डाळिंब उत्पादक संघाचे विभागीय संचालक राहुल सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. संचालक मंडळाच्या विशेष बैठकीत सोनवणे यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले. निवडीनंतर सोनवणे यांचा माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे तसेच संचालक मंडळ व इतर मान्यवरांनी सत्कार केला. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष किशोर भामरे, व्यापारी बँकेचे अध्यक्ष अशोक निकम आदी उपस्थित होते
फेरीवाला संघटनेवर गौतम पगारे व किरण हिरवे
नाशिक शहर फेरीवाला संघटनेची बैठक प्रदेश संघटक गोपीनाथ क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रास्ताविक सचिन कोकाटे यांनी करून पंचवटी शहर कार्यकारिणीच्या निवडीचा ठराव मांडला. सर्वानुमते पंचवटी शहर अध्यक्षपदी गौतम पगारे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सागर भोरे, सचिवपदी रवींद्र गांगुर्डे तर संघटक म्हणून दीपक सकट यांची निवड करण्यात आली. दरम्यान राष्ट्रीय फेरीवाला संघटनेच्या नाशिक शहर उपाध्यक्षपदी तसेच नाशिक जिल्हा कार्यकारिणी सक्रिय सभासदपदी किरण हिरवे यांची नियुक्ती करण्यात आली.