जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान अभियान वाहतूक सुधारणा प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या वतीने शहरातील विजय टॉकीज ते आनंद टॉकीजदरम्यान बांधण्यात येत असलेल्या रेल्वे भुयारी पुलाचे काम येत्या १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी कंत्राटदार व अधिकाऱ्यांना दिले. हा रेल्वे भुयारी पूल ‘पूश बॅक’ पद्धतीने बांधण्यात येत आहे. महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी अधिकाऱ्यांसोबत पुलाच्या कामाची पाहणी केली. या पुलाला जोडणाऱ्या पोचमार्गाचे कामही पूर्णत्वास आले आहे. एका बाजूचे विद्युतीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्याचे कामही वेगात सुरू आहे. पदपथाची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. नागरिकांना रस्ता वाहतुकीसाठी लवकर सुरू करता यावा म्हणून पुलाची उर्वरित कामे जलद गतीने १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश आयुक्तांनी दिले. या पाहणी दौऱ्यात आयुक्तांसोबत शहर अभियंता संजय गायकवाड, स्थावर अधिकारी डी.डी. जांभूळकर, सहायक आयुक्त महेश मोरोणे, तांत्रिक सल्लागार एच.जी. शेख, कमलाकर देशपांडे व आशीष चापेकर उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2012 रोजी प्रकाशित
रेल्वे भुयारी पुलाचे काम १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करा-वर्धने
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान अभियान वाहतूक सुधारणा प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या वतीने शहरातील विजय टॉकीज ते आनंद टॉकीजदरम्यान बांधण्यात येत असलेल्या रेल्वे भुयारी पुलाचे काम येत्या १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी कंत्राटदार व अधिकाऱ्यांना दिले. हा रेल्वे …
First published on: 28-12-2012 at 01:44 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway underground way work should complete within 15 january vardhane