विदर्भातील अनेक जिल्ह्य़ांना दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून हजारो गावांवर बादलीभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. भविष्यात पाणीप्रश्न आणखी गंभीर होण्याचे संकेत मिळाल्यानंतरही जलसंधारणातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या रेनवॉटर हार्वेस्टिगकडे महापालिका आणि नागरिक दुर्लक्ष करीत आहे. शहरात मोठय़ा प्रमाणात सुरू असलेले बांधकाम पाहता पाण्याच्या अपव्ययाचे प्रमाण यंदा अधिक आहे.
पाणी टंचाई आली की विहीर खोदण्याचे काम केले जाते. पण, उन्हाळ्यात रेनवॉटर हार्वेस्टिंगची तयारी करण्यात शासकीय यंत्रणा उदासीन आहे. गेल्या काही वर्षांपासून नागपूर शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई असताना अनेक द्रविडी प्राणायम प्रशासनाने केले. रेनवॉटर हार्वेस्टिगची सक्ती शहरात लागू केलेली नाही. शहरात मोठय़ा प्रमाणात बांधकाम होत आहे. पण, येथे रेनवॉटर हार्र्वेस्टीग करण्यात बांधकाम व्यावसायिक व वैयक्तिक बांधकाम करता लक्ष देताना दिसत नाही. नगर रचना विभाग याकडे काणाडोळा करीत आहे. विकास नियमावलीत नव्या बांधकामांना परवानगी देताना तथे रेनवॉटर हार्वेस्टीग अनिवार्य असूनही हा महत्त्वाचा पैलू दुर्लक्षित आहे.
रेनवॉटर हार्वेस्टिंगची सोय उन्हाळ्यात केली जाऊ शकते. महापालिकेने त्यांच्या ताब्यातील सार्वजनिक जागांवर रेनवॉटर हार्वेस्टिंगची सोय करण्याची गरज आहे. पण, तसे होताना दिसत नाही. नव्या बांधकामांना परवानगी देताना रेनवॉटर हार्वेस्टिगची सक्ती केल्यास पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविण्यात मोलाची मदत होईल. ग्रामीण भागात शिवकालीन पाणीसाठवण योजना अस्तित्वात असताना यात कुठलेही ठोस काम होताना दिसत नाही. रेनवॉटर हार्वेस्टीगसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आग्रहाची भूमिका घेण्याची गरज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. तसेच उठसूट बांधकाम करणाऱ्यांवर व पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Apr 2013 रोजी प्रकाशित
रेनवॉटर हार्वेस्टिंगकडे सर्वाचेच दुर्लक्ष
विदर्भातील अनेक जिल्ह्य़ांना दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असून हजारो गावांवर बादलीभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. भविष्यात पाणीप्रश्न आणखी गंभीर होण्याचे संकेत मिळाल्यानंतरही जलसंधारणातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या रेनवॉटर हार्वेस्टिगकडे महापालिका आणि नागरिक दुर्लक्ष करीत आहे.
First published on: 19-04-2013 at 02:09 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain water harvesting ignored by all