संधीचा फायदा उचलत मित्राच्याच पत्नीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे. घर सोडून गेलेल्या मित्राच्या पत्नीला आणण्यासाठी आरोपी गेला होता. मात्र संधीचा फायदा उचलत त्याने तिच्यावर बलात्कार केला.
चेंबूरच्या टिळकनगर परिसरात ही २० वर्षीय विवाहित महिला राहते. दोन वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. मात्र, मागील सहा महिन्यांपासून पती पत्नीमध्ये भांडणे होत होती. सोमवारी संध्याकाळीही त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्या रागाच्या भरात ही महिला घर सोडून निघून गेली. तिच्या पतीने लगेच आपला मित्र विरलसेन (२२) याला फोन केला. माझी पत्नी रागावली आहे. तिची समजूत काढून घरी घेऊन ये, असे पतीने मित्राला सांगितले. विरलसेन हा परळ येथील रेल्वे वसाहतीत रहातो. एका मित्राची 1स्कूटर घेऊन तो मित्राच्या पत्नीला घेण्यासाठी गेला. परंतु त्याने पीडित महिलेला घरी न आणता कुर्ला रेल्वे यार्डातील निर्जन जागेवर नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. घरी आल्यावर पीडित महिलेने पतीला हा प्रकार सांगितला. त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी विरलसेन आणि या गुन्’ाात मदत करणारा त्याचा मित्र मणिचंदन यांना अटक केली. या दोघांनाही १८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2014 रोजी प्रकाशित
मित्राच्या पत्नीवर बलात्कार दोघांना अटक
संधीचा फायदा उचलत मित्राच्याच पत्नीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे.
First published on: 17-01-2014 at 06:18 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape on freinds wife two arrested