शिवसेनेतील ठाणे बंडाला आमदारांची रसद?

पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी असलेले पाटील शिवसेनेत आले तेच मुळी आमदारकी मिळावी यासाठी. प्रताप सरनाईकांमुळे पाटलांची आमदारकी हुकली, परंतु आर्थिक ताकदीच्या जोरावर दीड वर्षांपूर्वी त्यांनी ठाण्याचे महापौरपद पटकावले. तेव्हापासूनच शिवसेनेतील एका मोठय़ा गटात त्यांच्याविरोधात नाराजी खदखदते आहे.

पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी असलेले पाटील शिवसेनेत आले तेच मुळी आमदारकी मिळावी यासाठी. प्रताप सरनाईकांमुळे पाटलांची आमदारकी हुकली, परंतु आर्थिक ताकदीच्या जोरावर दीड वर्षांपूर्वी त्यांनी ठाण्याचे महापौरपद पटकावले. तेव्हापासूनच शिवसेनेतील एका मोठय़ा गटात त्यांच्याविरोधात नाराजी खदखदते आहे. गेल्या आठवडय़ात ठाण्याच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांनी वर्तकनगर येथील एका काँग्रेस नगरसेवकाच्या प्रभागातील विकासकामाचा शुभारंभ केला आणि त्यास महापौरांची साथ लाभल्याच्या चर्चेमुळे नाराजांच्या बाहूत बळ संचारले. या कार्यक्रमामुळे महापौरांना लक्ष्य करण्याची आयती संधी चालून येताच नगरसेवकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठाण्यातील काही आमदारांनीही थेट महापौरांवर निशाणा साधल्याची चर्चा आता रंगली आहे. विशेष म्हणजे, महापौरांची सतत साथ करणारे एकनाथ शिंदें यांचेही या दबावतंत्राच्या राजकारणापुढे चालेनासे झाले असून शिवसेनेतील सुंदोपसुंदीने टोक गाठल्याचे चित्र यामुळे उभे राहिले आहे.  
ठाणे महापालिकेवर वर्षांनुवर्षे अधिराज्य गाजविणाऱ्या शिवसेनेत सध्या बंडाचे वारे वाहू लागले आहेत. विद्यमान महापौर हरिश्चंद्र पाटील यांना पदावरून दूर करावे, या मागणीसाठी पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांनीच कंबर कसली आहे. महापौरांची कार्यपद्धती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना अनुकूल असून त्यांना पदावर कायम ठेवल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव अटळ आहे, असा इशारा अशोक वैती, राजेंद्र साप्ते, राम एगडे आणि नरेश मणेरा या पक्षातील चार ज्येष्ठ नगरसेवकांनी आमदार एकनाथ शिंदें यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे. या पत्रावर शिवसेनेतील अवघ्या चार नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असल्या तरी या चौघांकडे महापालिकेतील पक्षाचा चेहरा म्हणून पाहिले जाते. यापैकी तिघे तर ठाण्यातील शिवसेना आमदारांच्या पालखीचे भोई म्हणूनच ओळखले जातात. अशोक वैती हे एकनाथ शिंदें यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात, तर राम एगडे यांचे पानही राजन विचारे यांच्याशिवाय हलत नाही. घोडबंदरचे नरेश मणेरा आणि या भागातील आमदार प्रताप सरनाईक यांचे सूरही चांगले जमले आहेत. कळव्याचे राजेंद्र साप्ते ज्येष्ठ असूनही पद मिळत नाही म्हणून शिवसेना नेत्यांवर नाराज आहेत. त्यामुळे महापौर पाटील यांच्याविरोधात सुरू झालेल्या पक्षांतर्गत मोहिमेत ते आघाडीवर असल्याचे बोलले जाते.
एकनाथ शिंदेंची कोंडी
दीड वर्षांपूर्वी अतिशय चुरशीच्या झालेल्या महापौर निवडणुकीत एकनाथ शिंदें यांनीच पाटील यांच्या नावावर मातोश्रीवरून शिक्कामोर्तब करून आणले. निवडणुकीतील अर्थकारणात पाटील उजवे ठरतील शिवाय पक्षातील एका आमदाराला कात्रजचा घाट दाखविता येईल, अशी दुहेरी चाल एकनाथरावांनी खेळली. गेल्या काही महिन्यांपासून महापौरांच्या कार्यपद्धतीमुळे आमदार िशदे यांच्या समर्थकांचा गटही नाराज असल्याची चर्चा आहे. ओवळ्याचे आमदार प्रताप सरनाईक आणि महापौरांचे तर अनेकदा खटके उडाले आहेत. वर्तकनगर भागात पवारांच्या हस्ते २४ तास पाणीपुरवठा कामाचा शुभारंभ झाला. त्या प्रभागातील एका शिवसेनेच्या नगरसेविकेला डावलून हा कार्यक्रम उरकल्याचा पक्षातील नगरसेवकांचा आक्षेप होता. तरीही महापौरांनी शुभारंभाच्या फायलीवर स्वाक्षरी केल्यामुळे प्रताप सरनाईकांसह शिवसेना नगरसेवकांमध्ये महापौरांविरोधात असंतोष पसरला असून त्याचा उद्रेक या ‘लेटरबॉम्ब’च्या माध्यमातून झाल्याचे बोलले जाते.
एकनाथ शिंदें यांनी पत्र देणाऱ्या चौघा नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. महापालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी आपण यासंबंधी काहीही बोलणार नाही, असे सांगितले.
पूर्वाश्रमीचे काँग्रेसवासी असलेले पाटील शिवसेनेत आले तेच मुळी आमदारकी मिळावी यासाठी. प्रताप सरनाईकांमुळे पाटलांची आमदारकी हुकली, परंतु आर्थिक ताकदीच्या जोरावर दीड वर्षांपूर्वी त्यांनी ठाण्याचे महापौरपद पटकावले. तेव्हापासूनच शिवसेनेतील एका मोठय़ा गटात त्यांच्याविरोधात नाराजी खदखदते आहे. गेल्या आठवडय़ात ठाण्याच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवारांनी वर्तकनगर येथील एका काँग्रेस नगरसेवकाच्या प्रभागातील विकासकामाचा शुभारंभ केला आणि त्यास महापौरांची साथ लाभल्याच्या चर्चेमुळे नाराजांच्या बाहूत बळ संचारले. या कार्यक्रमामुळे महापौरांना लक्ष्य करण्याची आयती संधी चालून येताच नगरसेवकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठाण्यातील काही आमदारांनीही थेट महापौरांवर निशाणा साधल्याची चर्चा आता रंगली आहे. विशेष म्हणजे, महापौरांची सतत साथ करणारे एकनाथ शिंदें यांचेही या दबावतंत्राच्या राजकारणापुढे चालेनासे झाले असून शिवसेनेतील सुंदोपसुंदीने टोक गाठल्याचे चित्र यामुळे उभे राहिले आहे.  
ठाणे महापालिकेवर वर्षांनुवर्षे अधिराज्य गाजविणाऱ्या शिवसेनेत सध्या बंडाचे वारे वाहू लागले आहेत. विद्यमान महापौर हरिश्चंद्र पाटील यांना पदावरून दूर करावे, या मागणीसाठी पक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांनीच कंबर कसली आहे. महापौरांची कार्यपद्धती काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना अनुकूल असून त्यांना पदावर कायम ठेवल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव अटळ आहे, असा इशारा अशोक वैती, राजेंद्र साप्ते, राम एगडे आणि नरेश मणेरा या पक्षातील चार ज्येष्ठ नगरसेवकांनी आमदार एकनाथ शिंदें यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे. या पत्रावर शिवसेनेतील अवघ्या चार नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असल्या तरी या चौघांकडे महापालिकेतील पक्षाचा चेहरा म्हणून पाहिले जाते. यापैकी तिघे तर ठाण्यातील शिवसेना आमदारांच्या पालखीचे भोई म्हणूनच ओळखले जातात. अशोक वैती हे एकनाथ शिंदें यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात, तर राम एगडे यांचे पानही राजन विचारे यांच्याशिवाय हलत नाही. घोडबंदरचे नरेश मणेरा आणि या भागातील आमदार प्रताप सरनाईक यांचे सूरही चांगले जमले आहेत. कळव्याचे राजेंद्र साप्ते ज्येष्ठ असूनही पद मिळत नाही म्हणून शिवसेना नेत्यांवर नाराज आहेत. त्यामुळे महापौर पाटील यांच्याविरोधात सुरू झालेल्या पक्षांतर्गत मोहिमेत ते आघाडीवर असल्याचे बोलले जाते.
एकनाथ शिंदेंची कोंडी
दीड वर्षांपूर्वी अतिशय चुरशीच्या झालेल्या महापौर निवडणुकीत एकनाथ िशदे यांनीच पाटील यांच्या नावावर मातोश्रीवरून शिक्कामोर्तब करून आणले. निवडणुकीतील अर्थकारणात पाटील उजवे ठरतील शिवाय पक्षातील एका आमदाराला कात्रजचा घाट दाखविता येईल, अशी दुहेरी चाल एकनाथरावांनी खेळली. गेल्या काही महिन्यांपासून महापौरांच्या कार्यपद्धतीमुळे आमदार शिंदें यांच्या समर्थकांचा गटही नाराज असल्याची चर्चा आहे. ओवळ्याचे आमदार प्रताप सरनाईक आणि महापौरांचे तर अनेकदा खटके उडाले आहेत. वर्तकनगर भागात पवारांच्या हस्ते २४ तास पाणीपुरवठा कामाचा शुभारंभ झाला. त्या प्रभागातील एका शिवसेनेच्या नगरसेविकेला डावलून हा कार्यक्रम उरकल्याचा पक्षातील नगरसेवकांचा आक्षेप होता. तरीही महापौरांनी शुभारंभाच्या फायलीवर स्वाक्षरी केल्यामुळे प्रताप सरनाईकांसह शिवसेना नगरसेवकांमध्ये महापौरांविरोधात असंतोष पसरला असून त्याचा उद्रेक या ‘लेटरबॉम्ब’च्या माध्यमातून झाल्याचे बोलले जाते.
एकनाथ शिंदें यांनी पत्र देणाऱ्या चौघा नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. महापालिकेतील सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी आपण यासंबंधी काहीही बोलणार नाही, असे सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Revolted thane shivsena activists get commissary from sena mla