रामटेकपासून सुमारे १० कि.मी. अंतरावरील सुरजीत ऑटो सव्र्हिसेस (पेट्रोलपंप) या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील प्रतिष्ठानात गुरुवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास टाटा सुमोने आलेल्या तीन आरोपींनी सशस्त्र दरोडा घातला. देशी कट्टय़ाच्या धाकावर आरोपींनी पेट्रोल पंपावरून ८३,४५४ रुपये लुटले. घटनेतील सर्व आरोपींचा सिनेस्टाईलने पाठलाग करून मध्यप्रदेश सीमेतील खवासा येथे पकडण्यात रामटेकचे सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. दीपक साळुंखे आणि त्यांचे पथक यशस्वी झाले.
आमडी शिवार राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास टाटा सुमोतून आलेल्या तीन आरोपींनी सुरजित ऑटो सव्र्हिसेस पेट्रोलपंपावर देशी कट्टय़ाचा धाक दाखवून रोख रक्कम नेल्याची माहिती सुरक्षा रक्षक रोशन मोहने याने पेट्रोलपंप मालकाला दूरध्वनीवरून दिली. त्यांनी लगेच नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस मुख्यालयाला याची सूचना दिली. ग्रामीण पोलीस मुख्यालयातून रामटेकचे सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. दीपक साळुंखे तसेच रामटेक, देवलापार व पारशिवनी पोलीस ठाण्यात माहिती कळताच देवलापार पोलिसांना नाकाबंदीची सूचना देण्यात आली.
रामटेक, पारशिवनी, देवलापार पोलिसांच्या सांघिक प्रयत्नाने या आरोपींना मध्य प्रदेशच्या सीमेतील खवासा येथे जेरबंद करण्यात आले. हेमंत गजराजसिंह पाल (२०) रा. अटाई, कीर्तीप्रसाद वीरेंद्रसिंह ठाकूर (२२) रा. खरकीली व प्रदीप बालगोविंदसिंह परिहार (२२) रा. ठाणाफ्लोरा (उ.प्र.) अशी त्यांची नावे असून त्यांच्याजवळून ३ देशी कट्टे, २५ जिवंत काडतुसे, १ लाख ४३ हजार रोख तसेच वापरात आणलेली टाटा सुमो जप्त करण्यात आली.
या आरोपींनी यवतमाळहून नागपूरला येण्यासाठी टाटा सुमो भाडय़ाने घेतली होती. नागपूरजवळ येताच त्यांनी सुमो चालकास गाडीत बांधून ठेवले आणि नागपूर बायपासने ते नागपूर-जबलपूर महामार्ग क्र. ७ वर आले. मनसरनजीकच्या सुरजीत पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना देशी कट्टय़ाचा धाक दाखवून तेथील एका खोलीत डांबले व रोकड घेऊन पसार झाले. मात्र या पंपावरील सुरक्षा रक्षक रोशन मोहने याच्या सतर्कतेने पोलिसांनाही तातडीने हालचाली करून कारवाई केली. पुढील तपास पारशिवनीचे पोलीस निरीक्षक जीवने करीत आहेत. आरोपींचा पाठलाग करण्यासाठी डॉ. दीपक साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली रामटेकचे पोलीस निरीक्षक किशोर गवई व चमू, देवलापारचे ठाणेदार यादव त्यांची चमू तसेच पारशिवनीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोस्वामी व पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले. आरोपींना पारशिवनी येथे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2012 रोजी प्रकाशित
मनसरनजीक पेट्रोलपंपावर दरोडा
रामटेकपासून सुमारे १० कि.मी. अंतरावरील सुरजीत ऑटो सव्र्हिसेस (पेट्रोलपंप) या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील प्रतिष्ठानात गुरुवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास टाटा सुमोने आलेल्या तीन आरोपींनी सशस्त्र दरोडा घातला. देशी कट्टय़ाच्या धाकावर आरोपींनी पेट्रोल पंपावरून ८३,४५४ रुपये लुटले.
First published on: 01-12-2012 at 06:12 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robery on petrolpump near mansar