नवी दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील मरण पावलेल्या तरुणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी औरंगाबाद शहरासह राज्यातील ‘सजग’ स्त्री-पुरुषांनी उद्या (रविवारी) सकाळी ११ रस्त्यावर येऊन एक मिनिट श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन सजग महिला संघर्ष समितीने केले आहे. शहरातील तापडिया नाटय़ मंदिरासमोर सकाळी ११ वाजता श्रद्धांजली वाहिल्यानंतर उपस्थित नागरिक मूक मोर्चाद्वारे पोलीस आयुक्त कार्यालयावर जाणार आहेत. मोर्चामध्ये स्त्री-पुरुषांनी काळे वस्त्र परिधान सहभागी व्हावे, असे आवाहन सजग महिला संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी, या दृष्टीने कायद्यात आवश्यक बदल करण्याची मागणी समितीतर्फे करण्यात आली. मोर्चात नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी चंदाताई जरीवाला, ताराबाई लड्डा, प्राचार्य मनोरमा शर्मा, डॉ. रश्मी बोरकर, मंगल खिंवसरा, डॉ. चारुलता रोजेकर, सुनीता जाधव आदींनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Dec 2012 रोजी प्रकाशित
‘सजग समिती’चा आज औरंगाबादेत मूकमोर्चा
नवी दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील मरण पावलेल्या तरुणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी औरंगाबाद शहरासह राज्यातील ‘सजग’ स्त्री-पुरुषांनी उद्या (रविवारी) सकाळी ११ रस्त्यावर येऊन एक मिनिट श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन सजग महिला संघर्ष समितीने केले आहे.
First published on: 30-12-2012 at 02:12 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sajag samiti silent march today in aurangabad