सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर
ठाणे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा १०० टक्के वापर व्हावा तसेच मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी मराठी विषयात पदव्युतर पदवी प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संबंधीचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे महापालिका प्रशासनाने मंजुरीसाठी आणला होता. या प्रस्तावास बहुमताने मंजुरी मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मराठी या विषयात पदव्युतर पदवी प्राप्त केलेल्या तसेच करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्यासंबंधीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार करून सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी आणला होता.
ठाणे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा १०० टक्के वापर व्हावा तसेच महापालिकेचा व्यवहार जास्तीत जास्त सोपा, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावा तसेच मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशातून हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावास नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मान्यता दिली. त्यामुळे मराठी पदवीप्राप्त कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील पूर्णवेळ नियमित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही योजना लागू होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अतिरिक्त वेतनवाढीचा लाभ कर्मचाऱ्यास एकदाच मिळणार आहे. विशेष म्हणजे, ज्या पदाच्या अर्हतेमध्ये मराठी भाषेतील पदव्युत्तर पदवी या अटीचा समावेश असेल, अशा पदांकरिता ही योजना लागू असणार नाही, असे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले होते.
मराठी भाषा शिका,
पण सवलत नाही
एकीकडे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा १०० टक्के वापर व्हावा तसेच मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी मराठी विषयात पदव्युतर पदवी प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव महापालिकेने केला आहे. असे असले तरी, या प्रस्तावात मराठी भाषेच्या पदव्युत्तर पदवीसाठी नवीन प्रवेश घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खातेप्रमुखांची पूर्वपरवानगी घ्यावी.
अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यालयीन सवलत मिळणार नाही. तसेच अध्ययन रजा मंजूर केली जाणार नाही, अशा अटी महापालिका प्रशासनाने लागू केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या दुहेरी भूमिकेमुळे या प्रस्तावास कर्मचारी त्यास कितपत प्रतिसाद देतील, या विषयी शंका आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Dec 2013 रोजी प्रकाशित
मराठी पदव्युत्तर पदवीधारकांना महापालिकेत वेतनवाढ
ठाणे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा १०० टक्के वापर व्हावा तसेच मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी मराठी विषयात पदव्युतर पदवी प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना
First published on: 26-12-2013 at 09:08 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salary increase