दिवाळीचा आनंद.. अंगणातील रांगोळी.. फराळाचा आस्वाद..मनोरंजनाच्या कार्यक्रमांची रेलचेल.. हे दिवाळीचे वातावरण सगळ्याच शहरांमध्ये सारखे असले तरी शांतीवनातील रुग्णांसाठी मात्र हा आनंद अभावानेच येणार असतो. या दु:खाला हळुवार फुंकर घालत त्यांच्या जीवनातील दिवाळी आनंदमय करण्याच्या उद्देशाने गेल्या अकरा वर्षांपासून उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयाचे तरुण प्रयत्न करत आहेत. कुष्ठरोग निवारण समिती आणि सीएचएम महाविद्यालयाचा हा उपक्रम शांतीवनातील रुग्ण आणि महाविद्यालय तरुणांसाठी वार्षिक उत्सवच बनला आहे. या आश्रमात दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी उल्हासनगरचे सीएचएम महाविद्यालयातील तरुण दरवर्षी भेट देत असतात.
संपूर्ण दिवस या आश्रमात राहून दिवाळीचा आनंद तेथील रुग्ण आणि ज्येष्ठांसह साजरा करतात. कुष्ठरोग निवारण समिती, सीएचएम महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी आणि उल्हासनगरचे युवक प्रतिष्ठान या सर्वाच्या तरुण कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. विद्यार्थानी आश्रमातील सजावट, रांगोळीने दिवाळीच्या वातावरणाची निर्मिती केली होती. त्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मनोरंजनाची मेजवानी दिली. नृत्य आणि विनोदी एकांकिका सादर करत या रुग्णाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला. कॉलेजची विद्यार्थिनी असलेल्या आणि मराठी वाहिनीवर अभिनेत्री म्हणून ओळख मिळवलेली जुई गडकर या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shantivan patients celebrating diwali
First published on: 13-11-2013 at 07:02 IST