महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांची अहमदनगर, शिर्डी, बीड आणि हिंगोली या चार लोकसभा मतदारसंघासाठी प्रभारी म्हणून नुकतीच नियुक्त करण्यात आली आहे.
अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्राचे प्रभारी हिम्मतसिंग यांनी नुकतीच या संदर्भात घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील ४४ लोकसभेसाठी एकूण १२ जणांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. हत्तीअंबीरे यांनी यापूर्वी विविध पदांवर यशस्वी रीत्या काम केले आहे. बुलढाणा आणि नांदेड येथे पक्ष निरीक्षक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वरिष्ठांनी नव्याने चार जिल्ह्य़ांची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेसचे शहर जिल्हा सचिव कपिल बनसोडे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2012 रोजी प्रकाशित
सिद्धार्थ हत्तीअंबीरे चार लोकसभांचे प्रभारी
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांची अहमदनगर, शिर्डी, बीड आणि हिंगोली या चार लोकसभा मतदारसंघासाठी प्रभारी म्हणून नुकतीच नियुक्त करण्यात आली आहे.
First published on: 20-11-2012 at 12:16 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidhhrath hattiambere will four loksabha head