उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळग्रस्त भागातील जनतेची खिल्ली उडवली व दुष्काळग्रस्तांची चेष्टा केली, त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या मागणीसंदर्भात क्रांती चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
शिवसेनेचे उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख विकास जैन, जयवंत ओक, संतोष जेजुरकर, सभागृह नेते राजू वैद्य, गटनेते गिरजाराम हळणोर, जिल्हा संघटक सुनीता आऊलवार आदी या वेळी उपस्थित होते.
मोहिमेत १ हजार ८७० नागरिकांनी स्वाक्षरी केली. अशीच मोहीम सोमवारी (दि. १५) टीव्ही सेंटर चौक, मंगळवारी (दि. १६) गारखेडा चौक येथे आयोजित केली आहे.