सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सेवेत हजर न राहता गेल्या सहा महिन्यांपासून दांडी मारणाऱ्या १८ कामचुकार शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. माळशिरस तालुक्यातील जन्मठेप झालेल्या एका शिक्षकाला सात दिवसांत बडतर्फ करण्याचा आदेशही या सभेत देण्यात आला.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्यासह अर्थ व बांधकाम समितीचे सभापती शिवानंद पाटील, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती जालिंदर लांडे, समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजी कांबळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती जयमाला गायकवाड आदींची उपस्थिती होती.
मागील सहा महिन्यांपासून शाळांकडे न फिरकणाऱ्या शिक्षकांना सेवेत कशाला ठेवायचे, असा सवाल स्थायी समितीमध्ये उपस्थित करून त्याबद्दल प्रशासनालाही धारेवर धरण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Nov 2012 रोजी प्रकाशित
सहा महिन्यांपासून गैरहजर राहणारे १८ शिक्षक निलंबित
सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सेवेत हजर न राहता गेल्या सहा महिन्यांपासून दांडी मारणाऱ्या १८ कामचुकार शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.
First published on: 08-11-2012 at 03:36 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Since 6 months absent 18 teachers are dismised