दिवाळीच्या सुटय़ात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेतर्फे नागपूरहून पुणे, मुंबईसाठी आणि नागपूर मार्गे विविध शहरांकरिता विशेष गाडय़ा सोडण्यात येत आहेत.
नागपूर मार्गे यशवंतपूर, जयनगर, हापा, बिलासपूर, कटरा, सिकंदराबाद, हजरत निजामुद्दीनसाठी विशेष गाडय़ा धावणार आहेत. (०१०१४) नागपूर-मुंबई-सीएसटी ही विशेष गाडी १९ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान दर रविवारी नागपूरवरून १६.१५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सोमवारी ८.१५ वाजता मुंबई येथे पोहोचेल. (०१०१३) मुंबई सीएसटी-नागपूर ही विशेष गाडी सीएसटीवरून १९ ऑक्टोबर ते ९ नोव्हेबरदरम्यान रविवारी रात्री ००.२० वाजता निघेल आणि त्याच दिवशी १५.०० वाजता नागपूरला पोहोचेल.
(०१२३६) नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडी १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबपर्यंत प्रत्येक बुधवारी ११.०० वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी पुण्याला ५.१० वाजता पोहचेल. (०१२३६) पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष गाडी १६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबपर्यंत प्रत्येक गुरुवारी ६.१५ वाजता प्रस्थान करेल आणि नागपुरात २२.१० वाजता पोहोचेल.
(०२६९७)यशवंतपूर-जयनगर साप्ताहिक प्रीमियम सुपरफारफास्ट ही गाडी २१ व २८ नोव्हेंबरला २०.५५ वाजता यशवंतपूरवरून सुटेल व तिसऱ्या दिवशी २३.३० वाजता जयनगर येथे पोहोचेल. ही गाडी २२ व २९ ऑक्टोबरला रोजी नागपूरला २०.५५ वाजता येऊन २१.०५ वाजता पुढे निघेल.
(०२६९८) जयनगर-यशवंतपूर प्रीमियम सुपरफास्ट साप्ताहिक ही गाडी २४ व ३१ ऑक्टोबर रोजी जयपूरवरून येथे पोहोचेल. ही गाडी २५ ऑक्टोबर व १ नोव्हेंबर रोजी नागपुरात १३.०० वाजता येईल व १३.१० वाजता पुढे निघेल. ०९५३५ हापा-बिलासपूर सुपरफास्ट ही विशेष गाडी १४, २१ व २८ ऑक्टोबर रोजी मंगळवारी हापावरून २२.२५ वाजता निघेल व तिसऱ्या दिवशी ४.५० वाजता बिलासपूर येथे पोहोचेल. ही गाडी १५, २२ व २९ ऑक्टोबरला नागपूरला २१.४० येईल आणि २१.५० वाजता निघेल.
(०९५३६) बिलासपूर-हापा ही विशेष गाडी १६, २३ व ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८.१० वाजता बिलासपूर येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी १४.५० वाजता हापा येथे पोहोचेल. ही गाडी १६, २३ व ३० ऑक्टोबर रोजी नागपूरला १५.०५ येईल आणि १५.१५ वाजता निघेल.
(०२६७९) यशवंतपूर-कटरा प्रीमियम सुपरफास्ट ही गाडी १८ व २५ ऑक्टोबर रोजी यशवंतपूरवरून ११.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १९.४५ वाजता कटरा येथे पोहोचेल. ही गाडी १९ व २६ ऑक्टोबर रोजी नागपूरला १३.३० वाजता येईल आणि १३.४० वाजता निघेल. (०२६८०) कटरा-यशवंतपूर ही गाडी २१ व २८ ऑक्टोबर रोजी ५.१५ वाजता कटरावरून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १५ वाजता यशवंतपूर येथे पोहोचेल. ही गाडी २२ व २९ ऑक्टोबरला ५.१५ वाजता कटारावरून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १५ वाजता यशवंतपूर येथे पोहचेल.
ही गाडी २२ व २९ ऑक्टोबर रोजी नागपूर १०.४० वाजता येईल आणि १०.५० वाजता रवाना होईल. (०२७२३) सिकंदराबाद-हजरत निजामुद्दीन ही विशेष गाडी रविवारी, १९ ऑक्टोबर रोजी ११.१५ वाजता सिकंदराबादवरून सुटेल आणि सोमवारी १५.०० वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल. ही गाडी १९ ऑक्टोबरला २१.०० वाजता नागपूरला येईल व २१.१० वाजता पुढे रवाना होईल. ०२७२४ हजरत निजामुद्दीन-सिकंदराबाद ही विशेष गाडी सोमवारी २० ऑक्टोबर रोजी हजरत निजामुद्दीनवरून निघेल आणि मंगळवारी २१.२५ वाजता सिकंदराबाद येथे पोहोचेल. ही गाडी २१ ऑक्टोबर रोजी १२.४० वाजता नागपूरला येईल व १२.५० वाजता सिकंदराबादकडे रवाना होईल.
संग्रहित लेख, दिनांक 17th Oct 2014 रोजी प्रकाशित
दिवाळीत मुंबई, पुण्यासाठी रेल्वेच्या विशेष गाडय़ा
दिवाळीच्या सुटय़ात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेतर्फे नागपूरहून पुणे, मुंबईसाठी आणि नागपूर मार्गे विविध शहरांकरिता विशेष गाडय़ा सोडण्यात येत आहेत.

First published on: 17-10-2014 at 12:46 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special trains in diwali for mumbai and pune from nagpur