सेंट जॉन शाळेच्या वतीने अलीकडेच विशेष मुलांसाठी आयोजित करण्यात आलेला क्रीडामहोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा झाला. यावेळी मूक बधीर, मतिमंद आणि अंध अशा तीन गटांमध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेत्री रेणूका शहाणे आणि निलम शिर्के यांनी स्पर्धाना उपस्थित राहून मुलांच्या प्रोत्साहनात भर घातली.
मूक -बधीर गटातून नाकोडा कर्ण बधिक शाळेने प्रथम, भैरव कर्ण बधीर शाळेने द्वितीय आणि रोटरी स्कूल फॉर डेफने तृतीय क्रमांक पटाकाविला. मतिमंद गटांतून होली क्रॉस शाळेने प्रथम, सेंट जॉन शाळेने द्वितीय तर स्वामी ब्रह्मानंद शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला. अंध विभागातून प्रगती अंध विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेरियन स्कॉट यांनी केले. सुषमा मंडलिक यांच्यासह शाळेतील कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात विशेष मेहनत घेतली होती.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2012 रोजी प्रकाशित
सेंट जॉन मध्ये विशेष मुलांचा क्रीडामहोत्सव
सेंट जॉन शाळेच्या वतीने अलीकडेच विशेष मुलांसाठी आयोजित करण्यात आलेला क्रीडामहोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा झाला. यावेळी मूक बधीर, मतिमंद आणि अंध अशा तीन गटांमध्ये विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
First published on: 14-12-2012 at 10:48 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sports festival in sent john school