विदेशी मद्यांचा साठा असलेले एक हजार २०२ खोके बेकायदेशीरपणे घेऊन जाणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील नगाव शिवारात पकडला. या कारवाईत ट्रकसह तब्बल ९५ लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ट्रक चालकाला अटक झाली असून न्यायालयाने त्याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
सोमवारी रात्री मुंबई-आग्रा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. नाशिककडून येणारा एक ट्रक थांबवून तपासणी केली असता ट्रकमध्ये विदेशी बनावटीचे मद्य असलेले एक हजार २०२ खोके आढळले. चालक मखनसिंग तारासिंग खजाना यास अटक करण्यात
आली.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2013 रोजी प्रकाशित
धुळ्याजवळ विदेशी मद्याचा साठा जप्त
विदेशी मद्यांचा साठा असलेले एक हजार २०२ खोके बेकायदेशीरपणे घेऊन जाणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील नगाव शिवारात पकडला. या कारवाईत ट्रकसह तब्बल ९५ लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

First published on: 27-06-2013 at 05:46 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stock of wine seize at dhule