एलबीटीविरोधात पुणे, मुंबई व्यापारी महासंघाने पुकारलेल्या राज्यव्यापी ‘बंद’ला लातूर शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त बंद पाळून जोरदार प्रतिसाद दिला. एलबीटीविरोधात लातूर व्यापारी महासंघाने प्रारंभापासून विरोधी भूमिका घेतली आहे. एलबीटी रद्द करण्याच्या मागणीसाठी लातूर व्यापारी महासंघाने सातत्याने प्रयत्न केले.
लोकशाही मार्गाने आंदोलनही केले. राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रातील व्यापारी या कराविरोधात एकवटले आहेत. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बसवराजअप्पा वळसंगे, सचिव दिनेश गिल्डा व पदाधिकाऱ्यांनी ‘बंद’चे आवाहन केले होते.