सुरश्री फाऊंडेशनतर्फे ११ ते १३ जानेवारी दरम्यान ‘स्वरभास्कर’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्यात पं. राजन-साजन मिश्रा, पं. अनिंदो चटर्जी, आरती अंकलीकर यांच्यासारखे दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. आयडियल कॉलनी मैदानावर हा महोत्सव होणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन आमदार सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. तालयोगी पं. सुरेश तळवलकर व पं. प्रभाकर जोग यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमात गायीका गौरी दामले-पठारे यांना ‘स्वरभास्कर’ सन्मान देण्यात येणार आहे. तसेच जेष्ठ संगीतकार पुरस्कार पं. तुळशीदास बोरकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. या महोत्सवात शमा भाटे, पं. विजय सरदेशमुख, गणेश-कुमरेश, गौरी दामले-पठारे, अनुराधा कुबेर हे कलाकारही सहभागी होणार आहेत.