टंचाईच्या झळा सोसणाऱ्या ग्रामीण भागात मनसेच्या वतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जामनेर तालुक्यातील ३७ गावांना याचा लाभ होत असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील ज्या गावांना टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, अशा सर्वच गावांत मनसेच्या वतीनेटँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. जिल्ह्याकरिता दहा टँकर मनसेकडे उपलब्ध असल्याचे अ‍ॅड. बाविस्कर यांनी सांगितले. जामनेर तालुक्यात पाणीपुरवठा करण्याच्या मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष जी. एम. महाले, माजी जिल्हा अध्यक्ष अनिल वानखेडे, विलास राजपूत, देवेंद्र धोंगडे, किरण जाधव आदी उपस्थित होते. जामनेर तालुक्यातील पहूर, पहूरपेठ, देवपिंप्री, देवपिंप्री फाटा, माळपिंप्री, कुंभारी, वाकोद, वडगाव, जांभळ, हिरवखेडा, पिंपळगाव, तांडा, सोनारी आदी ३७ खेडय़ांत सध्या टँकर सुरू आहेत.