प्रभाग समिती स्तरावर सेतू योजना राबवणार

ठाणे महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्राच्या धर्तीवर नऊ प्रभाग समित्यांमध्ये सेतु स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.

ठाणे महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्राच्या धर्तीवर नऊ प्रभाग समित्यांमध्ये सेतु स्थापन करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या नव्या प्रस्तावानुसार जन्म-मृत्यू दाखले तसेच कर भरण्याची सुविधा प्रभाग समिती स्तरावरच उपलब्ध होणार आहे. या सुविधा प्रभाग समितीमध्ये मिळणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार नाही, असा दावा केला जात आहे. येत्या २० जानेवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आणण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेने मुख्यालयात नागरिकांच्या सुविधेसाठी तसेच जलदगतीने सेवा देण्यासाठी मुख्यालयात सेतूची स्थापना केली आहे. या सेतूमार्फत जन्म-मृत्यूचे दाखले, कर भरण्याची सुविधा आणि इतर सर्व सुविधा आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचतो. या धर्तीवर नऊ प्रभाग समित्यांमध्ये अशी सुविधा देण्यात यावी, असा प्रस्ताव सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी पालिकासमोर ठेवला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thane news

ताज्या बातम्या