शिक्षकांचे संघटन मजबूत करण्याबरोबरच शिक्षकांच्या समस्या सोडविण्यावर येथे आयोजित काँग्रेसच्या शिक्षक शाखा विभागीय मेळाव्यात वक्त्यांनी भर दिला.
या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश शिक्षक शाखेचे प्रदेशाध्यक्ष मनोज पाटील यांची होती. कार्यक्रमाचे संयोजक नाशिक जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व्ही. डी. निकम यांनी प्रास्ताविक केले. या मेळाव्यास शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड, शिक्षक शाखेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण नेरपगार, बी. एन. ठाकरे, कैलास गवळी, संयोजक व्ही. डी. निकम आदी उपस्थित होते. शासनाने घेतलेले निर्णय सर्वांपर्यंत पोहोचविणे आणि शिक्षकांच्या व्यथा शासनापुढे प्रभावीपणे मांडून सोडवणुकीसाठी शिक्षक शाखा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हिताचे जे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले त्यात शिक्षक आघाडीचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे पाटील यांनी नमूद केले. शिक्षक कधीच भ्रष्टाचारात अडकत नाहीत. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे आश्वासन अॅड. छाजेड यांनी दिले. याप्रसंगी शैलेश राणे, रमाकांत बोटे, बी. एन. ठाकरे, अरुणा आहेर, सुनील पवार, वसंत निकम आदींची भाषणे झाली. मेळाव्यास धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिक जिल्ह्य़ातील २०० पेक्षा अधिक शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एम. सोनवणे यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 31st Oct 2013 रोजी प्रकाशित
काँग्रेस मेळाव्यात शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा
शिक्षकांचे संघटन मजबूत करण्याबरोबरच शिक्षकांच्या समस्या सोडविण्यावर येथे आयोजित काँग्रेसच्या शिक्षक शाखा विभागीय मेळाव्यात वक्त्यांनी भर दिला.
First published on: 31-10-2013 at 07:06 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The teachers issues discussed in congress rally