टेम्पो आणि कार यांच्यात समोरासमोर धडक बसून तिघेजण ठार तर एकजण जखमी झाला. हा अपघात वाशी तालुक्यातील विझोरा पाटीजवळ राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. मृतांमध्ये पंढरपूर येथील महाराजांचा समावेश असून, ते बीड येथे एका कार्यक्रमासाठी जात होते.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरून कारने जात असताना वाशी तालुक्यातील विझोरा पाटीजवळ टेम्पो (एचआर ४५ ए ८३३३) आणि कार यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये मेघश्याम गोपाळ जालनापूरकर (वय ६५, रा. पंढरपूर), पत्नी वैशाली जालनापूरकर (वय ६२) व त्यांचा सेवक श्रीनिवास प्रकाश कदम (वय ३५, रा. सेलू, जि. परभणी) हे तिघेजण इंडिका कारमधून (एमएच २० सीएच २४४३) एका कार्यक्रमासाठी बीडकडे निघाले होते. या अपघातात कारचालक शिवाजी मधुकर कानशुकले (वय-२८, रा. पाथरी, जि. परभणी) हा गंभीर जखमी झाला. त्यांना बीड येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2014 रोजी प्रकाशित
टेम्पो-कारची धडक, तिघेजण ठार
टेम्पो आणि कार यांच्यात समोरासमोर धडक बसून तिघेजण ठार तर एकजण जखमी झाला. हा अपघात वाशी तालुक्यातील विझोरा पाटीजवळ राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.
First published on: 17-02-2014 at 01:30 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three died in road accident