जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांची आठच दिवसात नगरहून जळगावला बदली झाली आहे. त्यांच्या जागी आता अनिल कवडे यांची नगरला जिल्हाधिकारी म्हणुन बदली झाली आहे.
शुक्रवारी रात्री मुंबईत तडकाफडकी बदल्यांचा आदेश झाला. सनदी अधिकाऱ्यांच्या मागच्याच आठवडय़ात झालेल्या बदल्यांच्या पहिल्या आदेशात अग्रवाल यांची नगरलाच जिल्हाधिकारी म्हणुन बदली झाली होती. तत्पुर्वी त्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी म्हणुन नगरलाच कार्यरत होत्या. गेल्या गुरूवारी त्यांची नगरलाच जिल्हाधिकारी म्हणुन बदली झाली, रविवारी सुट्टीच्याच दिवशी त्यांनी पदभार स्वीकारला होता. नगरलाच जिल्हाधिकारी म्हणुन बदली झाली होती तरी, बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या जिल्ह्य़ातील दोन्ही मंत्र्यांना ती मान्य नव्हती. अग्रवाल यांच्या जिल्हाधिकारीपदी झालेल्या नियुक्तीला काही संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनीही विरोध केला होता. निवडणूक आयोगाकडेही तशा तक्रारी करण्यात आल्या होत्या.
अग्रवाल यांच्या जागी अनिल कवडे यांची नगरला जिल्हाधिकारी म्हणुन बदली झाली आहे. ते पुर्वी पुणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन कार्यरत होते. मागच्या यादीत त्यांची नंदुरबारला बदली झाली होती, त्याऐवजी आता ते नगरला रूजू होतील.